जिल्हा परिषद, छत्रपती संभाजीनगर
A- A A+

जिल्हा परिषद, छत्रपती संभाजीनगर

E-HRMS संगणक प्रणाली

E-HRMS संगणक प्रणालीविषयी

प्रस्तावना

या संकेतस्थळाची निर्मिती श्री. अंकित, मुख्य कार्यकारी अधिकारी यांच्या संकल्पनेतून व श्री. राघवेंद्र घोरपडे, उप मुख्य कार्यकारी अधिकारी (सा.प्र.वि) यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आली आहे.

जिल्हा परिषद छत्रपती संभाजीनगर – E-HRMS संगणक प्रणाली ही जिल्हा परिषदेच्या कर्मचाऱ्यांसाठी व कार्यालयीन अधिकाऱ्यांसाठी विकसित केलेली एक अत्याधुनिक डिजिटल सुविधा आहे.

प्रणालीविषयी माहिती

या प्रणालीचा उद्देश कर्मचारी व्यवस्थापनाची सर्व कामे संगणकीकृत पद्धतीने करून प्रक्रिया अधिक सोपी, पारदर्शक व विश्वासार्ह करणे हा आहे.

या माध्यमातून प्रत्येक कर्मचाऱ्याची वैयक्तिक माहिती, शैक्षणिक तपशील, नियुक्ती दिनांक, पदोन्नती, बदली, निवृत्ती, वेतन तसेच सेवासंबंधी इतर सर्व माहिती सुरक्षितपणे नोंदवली जाते.

कार्यालयीन अधिकाऱ्यांसाठी स्वतंत्र Office Login सुविधा उपलब्ध आहे, ज्याद्वारे कार्यालयीन स्तरावरील सर्व माहिती नियंत्रित करता येते. कर्मचाऱ्यांसाठी सोयीस्कर Employee Login पर्याय दिला असून, यामधून प्रत्येक कर्मचारी स्वतःची सेवासंबंधी माहिती सहज पाहू शकतो.

या प्रणालीमध्ये कर्मचारी सेवेत रुजू झाल्यापासूनची संपूर्ण माहिती उपलब्ध होते. कर्मचारी कोणत्या कार्यालयात, कोणत्या पदावर व किती कालावधी कार्यरत होता याची माहिती या प्रणालीमध्ये उपलब्ध होते.

ही माहिती दरवर्षी होणाऱ्या सर्वसाधारण बदली प्रक्रियेसाठी महत्त्वपूर्ण ठरते.

मुख्य उद्दिष्टे
  • कर्मचारी माहिती व्यवस्थापन
  • डिजिटल सेवा नोंद
  • कार्यालयीन पारदर्शकता
  • प्रशासन सुलभ करणे
कर्मचारी सेवा माहिती
  • वैयक्तिक माहिती
  • शैक्षणिक माहिती
  • नियुक्ती दिनांक
  • सेवा इतिहास
सेवा इतिहास

या प्रणालीमध्ये कर्मचारी सेवेत रुजू झाल्यापासूनची संपूर्ण माहिती नोंदवली जाते. कर्मचारी कोणत्या कार्यालयात, कोणत्या पदावर व किती कालावधी कार्यरत होता याची सविस्तर माहिती या प्रणालीमध्ये उपलब्ध होते.

कर्मचाऱ्याच्या सेवा प्रवासामध्ये झालेल्या नियुक्त्या, पदोन्नती, बदली, कार्यभार बदल तसेच विविध कार्यालयांमध्ये केलेली सेवा यांची अचूक नोंद प्रणालीमध्ये ठेवली जाते. त्यामुळे कर्मचारी सेवा इतिहास कोणत्याही वेळी सहजपणे पाहता येतो.

या प्रणालीमुळे प्रशासनाला कर्मचाऱ्यांच्या सेवा नोंदींचा सखोल अभ्यास करणे सोपे होते. याचा उपयोग कर्मचारी नियोजन, पदस्थापना तसेच प्रशासकीय निर्णय घेण्यासाठीही प्रभावीपणे करता येतो.

विशेषतः दरवर्षी होणाऱ्या सर्वसाधारण बदली प्रक्रियेसाठी ही माहिती अत्यंत उपयुक्त ठरते. कर्मचारी कोणत्या ठिकाणी किती कालावधी सेवा बजावली आहे याच्या आधारे पारदर्शक व न्याय्य बदली प्रक्रिया राबविणे सुलभ होते.

दस्तऐवज व्यवस्थापन
  • नियुक्ती आदेश
  • पदोन्नती आदेश
  • बदली आदेश
PDF संग्रह

सर्व कागदपत्रे PDF स्वरूपात सुरक्षित संग्रहण

डिजिटल रेकॉर्ड

ऑनलाइन पाहणी दस्तऐवज डाउनलोड सेवा माहिती उपलब्ध

प्रणालीचे फायदे

या प्रणालीमुळे वेळेची व श्रमांची मोठ्या प्रमाणावर बचत होते. परंपरागत कागदी नोंदींच्या तुलनेत ही पद्धत वेगवान, अचूक व सुरक्षित आहे.

कर्मचारी व कार्यालय यांच्यातील संवाद अधिक परिणामकारक बनविणे, कामकाजात पारदर्शकता आणणे आणि शासनाच्या डिजिटलायझेशन उपक्रमाला चालना देणे हे या प्रणालीचे मुख्य वैशिष्ट्य आहे.

या प्रणालीद्वारे कर्मचारी सेवासंबंधी माहिती कोणत्याही वेळी ऑनलाइन स्वरूपात उपलब्ध होते. त्यामुळे आवश्यक माहिती शोधणे, अद्ययावत करणे व अहवाल तयार करणे अधिक सोपे होते. यामुळे प्रशासनिक कामकाज अधिक कार्यक्षम व सुव्यवस्थित पद्धतीने पार पाडता येते.

निष्कर्ष

एकंदरीत, E-HRMS संगणक प्रणाली ही जिल्हा परिषद छत्रपती संभाजीनगरची एक अभिनव पाऊल आहे जी आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करून प्रशासन अधिक कार्यक्षम, पारदर्शक आणि विश्वासार्ह बनवते.

Developed By :

हे संकेतस्थळ जिल्हा परिषेदेतील IT कक्षाचे प्रमुख श्री. पराग बीडकर, कनिष्ठ प्रशासन अधिकारी, व त्यांचे सहकारी यांनी तयार केले आहे.